Breaking News

आदिवासी भागांमध्ये अजूनही आपल्या मदतीची आवश्यकता: प्रविण धांडे.

आदिवासी भागांमध्ये अजूनही आपल्या मदतीची आवश्यकता: प्रविण धांडे.
राजूर/प्रतिनिधी :
काजवा प्रकल्पा कडून आदिवासी कातकरी बांधवांना मोठी मदत
कोरोना संकटग्रस्त काळातील लॉकडाऊन हे मोठे संकट असुन गरीब माणुस आणखीच खोलात जात जगण्याची लढाई करत आहे. त्याला या लढाईत सोबत करण्यासाठी काजवा प्रकल्प यांनी पुढाकार घेतला आहे. या काळात आदिवासी बांधवांना मदतीच्या हाताची गरज असल्याचे प्रतिपादन काजवा प्रकल्पाचे अध्यक्ष प्रविण धांडे यांनी केले. सध्या सगळं बंद असल्या कारणाने शेतमजुरी करणाऱ्या आदिवासी बांधवांवर बिकट परस्थिती उदभवलेली आहे.
    अकोले तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या वारंघुशी गावातील आदिवासी कातकरी बांधवांना काजवा प्रकल्पा तर्फे सामाजिक भावनेमधुन किराणाचे वाटप करण्यात. यावेळी ते बोलत होते.
 आदिवासी देशाचा मालक असुन व्यवस्थेचा बळी असल्याचे ते पुढे म्हणाले.याच बरोबर वेगवेगळ्या योजनांची माहिती देत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काजवा प्रकल्प कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
   यावेळी गावातील सामाजीक कार्यकर्ते राम लोटे म्हणाले की या संकटकाळात अश्या पद्धतीने मदत भेटणं म्हणजे खरच माणुसकी जिवंत असल्याची जाणीव येते. याचा आम्हाला अभिमान वाटतो. असे म्हणत सर्वांचे आभार मानले.
   या उपक्रमास सपना धांडे , राम लोटे, मार्कन्डय दिकोंडा, योगेश डोंगरे आदींचे सहकार्य लाभले.