Breaking News

पारनेर तालुक्यात सुपा येथे एक कोरोना बाधित,अकरा अहवाल निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यात सुपा येथे एक कोरोना बाधित,अकरा अहवाल निगेटिव्ह !
पारनेर प्रतिनिधी-
  पारनेर तालुक्यातील सुपा येथील 31 वर्षीय एक व्यक्ती त्याच्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
तर तालुक्यातील 11 अहवाल प्राप्त झाले आहेत यात जतेगाव 5 करंदी 1 पिंपरी जलसेन 1 पारनेर 1 रुई छत्रपती 1 सिद्धेश्वर वाडी 1 कातळवेढा 1 या गावातील अहवाल प्राप्त झाले आहे.
कोरोना बाधित व्यक्ती आहे तो 100 मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.