Breaking News

आदर्श ग्रामसेवकाच्या शिरसगावात तिन दिवस पाणीपुरवठा बंदहागणदारीमुक्तीचा पडला विसर !

आदर्श ग्रामसेवकाच्या शिरसगावात तिन दिवस पाणीपुरवठा बंद
हागणदारीमुक्तीचा पडला विसर

कोपरगाव प्रतिनिधी -
तालुक्यातील पुर्व भागात बाजारपेठेचे स्वरुप प्राप्त झालेल्या त्यात बाजार समितीची उपबाजार समिती स्थापन झालेल्या शिरसगांव ग्रामपंचायतीचा कारभार जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेल्या भाऊसाहेबांची इथले कारभारी म्हणुन पंचायत समिती स्तरावरुन नियुक्ती करण्यात आली आहे.ते सध्या दोन गावांचे कारभारी असल्याचे बोलले जाते.मात्र यामुळे गावाच्या मुलभूत प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही.त्यामुळे गावचा पाणीपुरवठा  तिन दिवस बंदच होता.याबाबत आदर्श भाऊसाहेबांशी आमच्या प्रतिनिधीने वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तरी फोनच न स्विकारणे हे त्यांचे कायमचे अंगवळणी पडलेले निदर्शनास आले
          शिरसगाव-सावळगाव ग्रुप ग्रामपंचायत असुन,त्यात सावळगावला नळाव्दारे पाणीपुरवठा केला जात नाही.मात्र शिरसगाव गावठाण हद्दित सुमारे दिडशेच्या आसपास नळधारक आहेत.ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेतून गावातील नागरीकांना पाणीपुरवठा केला जातो.मात्र टाकीतील पाण्याच्या दाबामुळे रिटन व्हॉल टाकणे गरजेचे होते.म्हणुन मुख्य पाणीपुरवठा प्रवाहावरील दाब कमी करण्यासाठी ग्रामपंचायतला रिटन व्हॉल बसवला मात्र कर्मचाऱ्यांने सांगुनही तो मजबूत न घेता प्लास्टिकचा हलक्या दर्जाचा खरेदी करुन वेळ मारुन नेली.पण परिस्थिती पुन्हा जैशे थे झाली आहे.त्याबाबत आज पुन्हा ग्रामपंचायत बैठकीचे आयोजन केले होते.या खेळात गाव मात्र तिन दिवस गाव पिण्याच्या  पाण्यापासुन वंचित राहिले काल सायंकाळी कसाबसा पाणीपुरवठा सुरु झाला असला तरी पुन्हा ते काम तातडीने करणे गरजेचे असल्याचे पाणीपुरवठा कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले.
        याबाबत नागरीकांच्या समस्यांची विचारपूस करण्यासाठी आदर्श भाऊसाहेबांना वारंवार संपर्क करुनही प्रतिसाद मात्र कदापीही देण्यात आलेला नाही. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यात  समन्वयाचा अभाव असुन सरपंचानी आदेश केल्यास ग्रामसेवक ऐकत नसल्याचे सरपंचांचे मत आहे. प्रत्येक कामांत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यातील समन्वयाचा अभाव अडथळा निर्माण करणारा ठरत असल्याचे नागरीकांचे मत आहे.
शिरसगाव ग्रामपंचायतीच्या कक्षेत उपबाजार समिती मिळाल्यामुळे बाजार समिती लिलावाच्या ठिकाणी असलेल्या गावठाण हद्दिचे नऊ हजार रुपये मासिक भाडे मिळते.शिवाय आठवडे बाजाराच्या लिलावाची वार्षिक रक्कमही मिळते मात्र तेथे शेतकरी तथा आठवडे बाजारातील भाजीविक्रेते,व्यापारी यांना शौचालयाची अद्याप व्यवस्थाच मोठी गैरसोय आहे.हागणदारीमुक्तीकडे डोळेझाक करणारा आदर्श वरीष्ठांनी बघणे गरजेचे आहे.
   याबाबत पंचायत समिती प्रशासन आदर्श भाऊसाहेबांना कामात सुधारणा करण्याचे आदेश देते की,तेथील समस्या ज्ञात होण्यासाठी शासकीय नियमानुसार गावात राहण्याची सक्ती करते  ते बघणे गरजेचे आहे.
                    
शासकीय नियमानुसार ग्रामसेवक त्या गावात राहणे गरजेचे आहे.मात्र हा नियम डावलून ग्रामसेवक गावात राहत नाही.त्यामुळे गावातील समस्यांची जाणिव होत नाही.जिथे माध्यम प्रतिनिधींचे फोन घेतले जात नाही तिथे नागरीकांचा तक्रारीचा पाढा ऐकण्यास ग्रामसेवक फोन उचलतात की नाही याबाबत देखील शंका आहे.