Breaking News

तालुक्यातील विविध सोसायट्याच्या वतीने तालुका विकास अधिकाऱ्यांंचा सत्कार

श्रीगोंदा/प्रतिनिधी
      अहमदनगर मध्यवर्ती  जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीगोंदा तालुका विकास अधिकारपदी वसंतराव जगताप साहेब यांची ची निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ मढेवडगाव व तालुकयातील  इतर सोसायटीच्या वतीने आयोजित केला होता यावेळी बोलताना जगताप म्हणाले कि जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे साहेब यांच्यामुळे मला या पदावर काम करण्याची हि संधी मिळाली असून या संधींचे पानसरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विकासाच्याहिताचे काम करणार असून आपल्या कार्यकाळात पदाला कोणतेही गालबोट लागणार नाही असा स्वच्छ व पारदर्शी असा कारभार करणार आहे. असे प्रतिपादन नवनिर्वाचित  तालुका  विकास अधिकारी यांनी बोलताना आपल्या भाषणात  व्यक्त केले.    
 यावेळी इतर मान्यवरांनीही तालुक्याच्या विकासाबाबत आपले  मत व्यक्त केले या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे साहेब,  सहकारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व विक्रमसिंह (दादा) वाबळे,  नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषकाका शिंदे,  पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे, मढेवडगाव सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब  वाबळे, कारखान्याचे माजी संचालक नामदेव (तात्या) शिंदे, सोसायटीचे व्हा. चेअरमन रावसाहेब जाधव, सोसायटीचे माजी चेअरमन वसंतराव उंडे, पंडितराव वाबळे, तसेच शिवाजीराव जाधव, विठ्ठलराव वाबळे, संतोषराव गुंड,  तसेच परिसरातील चिंभळा, शिरसगाव बोडखा, बाबुर्डी, बोरी, हंगेवाडी, लिंपणगाव, जंगलेवाडी,  माठ येथील सर्व सेवा संस्थेचे चेअरमन सचिव व पदाधिकारी सोसायटीचे सर्व संचालक व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      जिल्ह्यातील शेतक-यांना लवकरच गोड बातमी - संचालक दत्तात्रय पानसरे 
गेल्या गळीत हंगामात शेतक-यांचे उसाचे बिल  कारखान्यांना  कपात करून  न दिल्यामुळे  तालुक्यात २६४ कोटींची कर्जमाफी झाली तसेच  सद्यस्थितीत  ३  लाखापर्यंत बिगर व्याजी कर्ज  वाटप हीही योजना सुरु केली असून जिल्हा बँकेच्या माध्यमातून लवकरच आम्ही शेतकरी हिताचे  काही ठोस पावले उचलत असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही गोड बातमी लवकरच देऊ यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतक-यांना नक्कीच याचा  फायदा होईल अशी माहिती संचालक दत्तात्रय पानसरे यांनी यावेळी ''दै लोकमंथनशी'' बोलताना  दिली.