Breaking News

पारनेर तालुक्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता नऊवर, पुन्हा दोन व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह !

पारनेर तालुक्यात पुन्हा दोन व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह, कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता नऊवर
पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यात प्राप्त झालेल्या लॅब च्या अहवालानुसार सात व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहेत तर रॅपिड किट च्या माध्यमातून करण्यात आलेल्या चाचणी तील 47 व्यक्तींपैकी दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे यामध्ये ढवळपुरी येथील भानगडेवाडी 70 वर्षीय व कान्हूर पठार एक 21 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या दिवसभरात 9 वर गेली आहे.
रॅपिड किट च्या माध्यमातून केलेली चाचणीत 47 पैकी दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या यामध्ये कान्हूर पठार व भनगडेवाडी येथील व्यक्तींचा समावेश आहे. 
    यामध्ये लॅब च्या अहवालानुसार  ढवळपुरी १ पाडळी दर्या १ म्हसोबा झाप १ तिखोल २ सुपा १  एक कोरोना बाधित व्यक्तीचा पत्ता पारनेर झाला आहे तो सध्या केडगाव  भूषण नगर येथे राहत असून मूळ तो दैठणे गुंजाळ येथील आहे. तालुक्यात आज एकूण नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
      तर २१ संशयित व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात नांदूर पठार १ जातेगाव १ सुपा १ देवीभोयरे २ टाकळी ढोकेश्वर ३ रांधे ११ कान्हूर पठार २  या गावातील २१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
ज्या परिसरात कोरोना बाधित व्यक्ती आहेत तो १०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असल्याची आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.