Breaking News

पारनेर तालुक्यात धोत्रे येथील एक व्यक्ती कोरोना बाधित

पारनेर तालुक्यात धोत्रे येथील एक व्यक्ती कोरोना बाधित
पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यात दि 26 रोजी प्राप्त झालेल्या खाजगी  लॅब च्या अहवालानुसार धोत्रे येथील 71 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 100 पार गेली आहे कोरोना बाधित रुग्णांचा तालुक्यातील वाढता आलेख हा चिंतेचा विषय होत आहे 
 कोरोना बाधित व्यक्ती आढळलेल्या शंभर मीटर परिसरात  कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे असे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.