Breaking News

माध्यमिक आश्रमशाळा कुरूंद यशाची परंपरा कायम.

माध्यमिक आश्रमशाळा कुरूंद यशाची परंपरा कायम.
पारनेर प्रतिनिधी -
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर केला यामध्ये अतिशय ग्रामीण भागामध्ये असलेल्या पारनेर तालुक्यातील कुरुंद येथील माध्यमिक आश्रमशाळा कुरुंद या शाळेचा इ. 10 वी चा निकाल  96% असा लागला झाकणे किरण ८६.४% दातीर ऋषिकेश ८१.२% माने राहुल ७३.८% असे यश मिळवले. 
यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक  श्री.आहेर आर आर, श्री साठे, श्री.मांडगे श्री.खांडरे यांचे मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रमेश गायकवाड आणि संस्थेचे सचिव सतीश गायकवाड,कुरुंद चे सरपंच विमल जाधव,उपसरपंच सुनीता घुले व पत्रकार निलेश शेंडगे यांनी अभिनंदन केले.