Breaking News

देवळाली प्रवरा नगरपालिका क्षेत्रात एकूण १३ रुग्ण सापडले त्या पैकी ४ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले.

देवळाली प्रवरा नगरपालिका क्षेत्रात एकूण १३ रुग्ण सापडले त्या पैकी ४ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले.
देवळाली प्रवरा प्रतिनिधी                                     
                      देवळाली प्रवरा नगरपालिका क्षेत्रात एकूण १३ रुग्ण सापडले असुन त्या पैकी ४ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. संपर्कात आलेल्या ७० नागरिकांना क्वारंनटाईन करण्यात आले आहे.
                देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील कोरोना पर्शवभूमीवर  मुख्याधिकारी अजित निकत यांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की नागरिकांनी सामाजिक अंतर ,मास्क वापर करावा देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत राहुरी कारखाना आज पर्यंत १३ रुग्ण कोरोना बाधीत निघाले आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतराचा वापर करावा कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांनी बाहेर पडू नये नागरिकांनी स्वतः ला घशात व इतर कोणताही त्रास झाल्यास प्राथमिक वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क साधावा असे आव्हान निकत यांनी केले आहे
               येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  आण्णासाहेब  मासाळ यांनी सांगितले की नगरपालिका हद्दीत १३ रुग्ण कोरोना बाधीत आढळले असून ४ रुग्णांवर उपचार करून सोडण्यात आले आहे.कोरोना बाधीत रुग्ण उपचारा ला प्रतिसाद देत आहे.रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ७० नागरीकांना कृषी विद्यापीठ येथे क्वारंनटाईन करण्यात आले आहे. बाधीत रुग्णांपैकी देवळाली प्रवर येथील एका वस्तीवरील रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहे.काँटेनमेंट झोन मधील नागरिक संपर्कात आल्या नंतर स्त्राव तपासणीसाठी सहकार्य करीत आहे.नागरिकांनि संपर्कात आल्या नंतर स्वतः हुन पुढे आले पाहिजे असे आवाहन डाँ.मासाळ यांनी केले आहे
                राहुरी कारखाना येथील विवेकानंद नर्सिंग होम मध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सोमवार पासून सुरू करण्यात येणार आहे.यासंबधी प्राचार्य डॉ.विलास कड यांनी सांगितले की नर्सिंग होम मध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.नर्सिंग होम मध्ये २ वार्डची तयारी करून ठेवली आहे.प्रशासकीय पातळीवर रुग्ण पाठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत शासकीय वाद्यकीय अधिकारी ,नर्सिंग होमचे सर्व अधिकारी कर्मचारी कोविड सेंटर साठी सहकार्य करणार आहे असे डॉ. कड यांनी सांगितले.