Breaking News

"मढेवडगांव" मध्ये दिसतंय "कोकण" चं रूप

"मढेवडगांव" मध्ये दिसतंय "कोकण" चं रूप 
काष्टी :-
 श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड हायवे वरील मढेवडगांव या छोट्याश्या गावामध्ये दिसतंय कोकणचं सौंदर्य सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे. दरवर्षी पेक्षा यंदा मढेवडगाव चं सौंदर्य जरा वेगळंच पहावयास मिळत आहे. मढेवडगांव मध्ये आल्यावर कोकणामध्ये आल्यासारखा भास होतोय कोकणचं रूप दिसत आहे. 
पाऊसाच्या उंच ढगांमधून येणाऱ्या लहरी, हळुवार थंड हवेचा होणारा स्पर्श, विजांचा होणारा कडकडाट, पहाटे होणारी धुक्यांची दाटी या सर्वांचं होणारं मढेवडगाव च्या रूपातील कोकण च निसर्ग रम्य दर्शन उंच इमारतीवर गेल्यावर पहावयास मिळत आहे. जवळपास दहा दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.