Breaking News

सोनई पाठोपाठ सलाबतपूर मध्ये ही आढळले कोरोना बाधीत !

सोनई पाठोपाठ सलाबतपूर मध्ये ही आढळले कोरोना बाधीत
नेवासा तालुका प्रतिनिधी : 
सोमवारी तालुक्यातील सलाबतपूर,जळके, गिडेगाव येथील ६० व्यक्तीच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये सोळा व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले असून उर्वरित ४४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले.
नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे मागील दोन दिवसात सात कोरोना बाधित रुग्ण आढळले होते.या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील साठ व्यक्तींची नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी, नेवासा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर मोसिन बागवान यांच्या वैद्यकीय पथकाने रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.यामध्ये सलाबतपूर येथील चौदा,गिडेगाव येथील एक व जळके येथील एक असे सोळा व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले तर उर्वरित चौवेचाळीस व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कोरोना बाधीत सोळा व्यक्तींना उपचारासाठी नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.