Breaking News

पारनेर तालुक्यात आज एक कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यात आज एक कोरोना बाधित !
पारनेर प्रतिनिधी :-
 तालुक्यातील रुई छत्रपती येथील काही दिवसांपूर्वी एका 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती त्याच्या कुटुंबातील त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याचे तिच्या कोरोना चाचणी अहवालात निष्पन्न झाले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
  रुई छत्रपती येथील 50 वर्षीय व्यक्ती हा शारीरिक व्याधींनी आजारी होता त्याला नगर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आली होती त्यानंतर त्याचा स्राव कोरोना चाचणी साठी घेण्यात आला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे कोरोना चाचणीसाठी स्राव घेण्यात आले होते त्यात ही महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान दिवसभरामध्ये आज तालुक्यातील एकच अहवाल प्राप्त झाला आहे व तोही पॉझिटिव आला आहे.
रुई छत्रपती येथील बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीच्या कोरोना चाचणी करण्यात आली होती त्या निगिटिव्ह आल्या एक अहवाल प्रलंबित होता तो आज पोजिटिव्ह प्राप्त झाला.
तालुक्यात अजूनही 100 हून अधिक कोरणा चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत त्या अहवालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.