Breaking News

कोपरगाव मध्ये कोरोना ची वाटचाल ५० शी कडे ?

कोपरगाव मध्ये कोरोना ची वाटचाल ५० शी कडे ?
करंजी प्रतिनिधी- 
   आज शनिवार म्हणजे कोपरगाव करांसाठी काळा दिवस म्हणून ओळखला जाईल याचे कारण म्हणजे  सकाळी उठताच ३ रुग्ण दुपारी २ रुग्ण आणि आता परत ३ रुग्ण या मुळे भीतीचे वातावरण कोपरगाव तालुक्यात पसरले आहे.
  काल कोपरगाव आरोग्य विभागाकडून १५ संशयितांचे स्वाब तपासणीसाठी पाठवले असता ते आता ७ वाजता प्राप्त झाले असून यात १२ अहवाल निगेटीव्ह आले असले तरी ३ अहवाल पॉजिटीव्ह आले यात अनुक्रमे २३ व २५ वर्षीय कोपरगावातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या साई सिटी परिसरातील पुरुष व कोपरगाव शहरालगत असलेल्या रुईकर वस्ती वर २० वर्षीय पुरुष पॉजिटीव्ह आढळून आल्याने आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कोपरगाव तालुक्यात एकूण ८ रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले आहे.