Breaking News

राज्यात दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस !

राज्यात दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस
पुणे/प्रतिनिधी
येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात राज्यात तुरळक ठिकाणी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. जुलै महिन्याच्या अखेरीस मुंबईतही चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यासह मुंबई आणि उपनगरामध्ये पाऊस गेल्या दोन दिवसांपासून गायब आहे. दरम्यान, पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची श्ाक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसपर्यंत सामान्यपेक्षा जास्त राहील आणि ते ३३ ते ३४ अंशांच्या श्रेणीमध्ये असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.