Breaking News

राज्यातील दुध बंद एल्गार आंदोलनात पारनेर तालुक्यातील सामाजिक संघटनांचाही सक्रिय सहभाग !

 राज्यातील दुध बंद एल्गार आंदोलनात पारनेर तालुक्यातील सामाजिक संघटनांचाही सक्रिय सहभाग !
पारनेर / प्रतिनिधी :
            दुध दरवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यात १ ऑगस्ट ला होत असलेल्या दुध बंद एल्गार आंदोलनात पारनेर तालुक्यातील सामाजिक संघटनांचाही सहभाग असणार आहे.या संदर्भातील लेखी निवेदन पारनेर तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला बुधवारी सामाजिक संघटनांच्या प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने दिले आहे. या शिष्टमंडळात शेतकरी नेते अनिल देठे पाटील , लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे , सामाजिक कार्यकर्ते बबनराव कवाद , सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर , युवा प्रतिष्ठानचे मनोज तामखडे , दत्ताञय कवाद आदींचा समावेश होता.
             कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यापासून दुध खरेदी दरात मोठी घसरण झालेली आहे.गेली चार महिन्यांपासून दुधाचे दर १७ ते १८ रूपयांपर्यंत खाली आल्याने राज्यातील दुध उत्पादक शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पुढाकार घेत दुधाला प्रतिलीटर ३० रू.दर मिळावा किंवा प्रतिलिटर १० रूपये अनुदान मिळावे तसेच दुधभुकटिला निर्यातीवर प्रतिकीलो ५० रू.अनुदान मिळावे या मागणीसाठी १ ऑगस्ट रोजी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ.सदाभाऊ खोत , किसान सभेचे राज्यसरचिटणीस डॉ.अजित नवले , राज्य सुकाणू समिती सदस्य तथा शेतकरी नेते अनिल देठे पाटील  धनंजय धोरडे , बळीराजा शेतकरी संघाचे रोहिदास धुमाळ , छावा क्रांतीकारी पक्षाचे मधुकर म्हसे आदिनीं दुध उत्पादक शेतकऱ्यांचा दुध बंद एल्गार पुकारलेला आहे. सदर आंदोलनास पारनेर तालुक्यातील लोकजागृती सामाजिक संस्था , शिवबा संघटना , प्रहार जनशक्ति पक्ष , अहमदनगर जिल्हा कल्याणकारी दुध संघ आदी संघटनांनी जाहीर पाठिंबा देत सक्रीय आंदोलनात सहभागी होण्याचे जाहिर करत बुधवारी पारनेर येथील तहसील कार्यालयास व पारनेर पोलिस  उपनिरीक्षक श्री संजय बोञे यांना लेखी निवेदन दिले आहे.