Breaking News

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी : शांताराम लंके

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी : शांताराम लंके 
निघोज प्रतिनिधी / संदिप गाडे
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असुन त्यांचे विचार व कार्य आचरणात आणणे ही काळाची खरी गरज आहे असे प्रतिपादन कन्हैया उद्योग समुहाचे अध्यक्ष शांताराम मामा लंके यांनी केले.सोमवार(दि.२०)रोजी निघोज(ता.पारनेर)येथे ग्रामपंचायतच्या 
१४ वा वित्त आयोगा अंतर्गत लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या सभामंडप संरक्षण भिंत बांधकामाच्या सुमारे(३.लक्ष)कामाचा भुमिपूजण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना त म्हणांले गावात ग्राम विकास महत्वाचा आहे,त्यामुळे ज्या भागात ग्राम विकासाची कामे बाकी आहे,त्याठिकाणी येत्या काळात अनेक कामे मोठ्या प्रमाणांवर सरपंच ठकाराम लंके यांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेली जातील असेही शांताराम मामा लंके म्हणांले.
       यावेळी मळगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद,सरपंच ठकाराम लंके,निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेव थोरात,मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके,सचिव शांताराम कळसकर,शिवाजी वराळ,भिवाशेठ रसाळ,उपसरपंच बाबाजी लंके,ग्रामपंचायत सदस्या शैला,खराडे,भावना साळवे आदि उपस्थित होते.
       यावेळी सरपंच ठकाराम लंके बोलतांना म्हणांले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी समाजप्रबोधन, लोकजागृती साठी मोठे योगदान दिले आहे त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन दलित वस्तीचा विकास व्हावा म्हणून ग्रामपंचायत व आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या माध्यमातून येत्या काळात मोठय़ा प्रमाणांत विकासकामे मार्गी लावून गोरगरीब गरजूंसाठी अनेक योजना राबविणांर असल्यांचे प्रतिपादन सरपंच लंके यांनी व्यक्त केले. 
    कोरोनाच्या महामारीने जनजीवन मोठ्या प्रमाणांवर विस्कळीत झाले,गावातिल ग्रामस्थांनाअनेक अडचणिचा सामना करावा लागला तरीही तो तुम्ही स्वतःसाठी व आपल्या गावासाठी सहन करून प्रशासनास व कोरोणा ग्राम सुरक्षा समितीला सहकार्य केले या बद्दल आपणांस धन्यवाद देतो असेही लंके म्हणांले.यावेळी आबा लंके,सतिश साळवे,प्रकाश साळवे,बाबाजी साळवे,मोहन साळवे,जी एस महानगर बँकेचे अधिकारी साळवे, विष्णू आल्हाट,संपत वैरागर,ज्ञानदेव साळवे,विष्णू साळवे, शशिकांत साळवे,कैलास साळवे,नाथा साळवे, संजय साळवे,लक्ष्मण साळवे,सचिन साळवे,संजय साळवे,विशाल साळवे,संतोष
 कनिंगध्वज,शांताराम कनिंगध्वज,भिमा साळवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसेवक वाळके भाऊसाहेब यांनी सर्वांचे आभार मानले.

"आदर्शगाव राळेगणसिद्धी,हिवरे बाजार सारखी ग्रामविकासाची मंदिरे निर्माण होण्यांकरीता लोकसहभागाबरोबरच,लोकजागृती,आणि सर्वांच्या सहकार्यांची आदर्श ग्रामविकासा साठी खरी गरज आहे.
-----
         (सरपंच.ठकाराम लंके)