Breaking News

एकलव्य रेसिडेंशियल स्कूल मवेशी CBSE इयत्ता दहावीचा 100% निकाल...!

एकलव्य रेसिडेंशियल स्कूल मवेशी CBSE इयत्ता दहावीचा  100% निकाल...!
राजूर प्रतिनिधी :
    शैक्षणिक संकुल मवेशी येथील महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी  नाशिक संचलित एकलव्य रेसिडेंशियल स्कूल मवेशी ही नगर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकमेव cBSE  पॅटन॔ शाळा असून सदर शाळा नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व आदिवासी विद्यार्थी डाॅक्टर, इंजिनिअर व सनदी अधिकारी निर्मान व्हावेत या उद्देशाने  सन 2015 मध्ये मवेशी याठिकाणी शासना तर्फे  स्थापन करण्यात आली आहे.27 एकर क्षेत्रात निसर्गरम्य परिसरात भव्य इमारत असुन नगर,नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजातील अनेक आदिम जनजातीचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.माच॔ 20 मध्ये  शाळेची इयत्ता दहावीची पहिलीच बॅच होती,.तर 57 विद्यार्थी परिक्षेस बसले होते.शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून  घवघवीत यश संपादन 
केले आहे .  
        शाळेचा  ज्ञानेश्वर पावरा  87% टक्के गुण मिळवून प्रथम  तर दारासिंग पाडवी 85% शितल भारमल 84% विद्या बागुल 84 टक्के अनिता भोये 83% सुरज सापटे 83% एवढे गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केलेले आहे. शाळेचे अठरा विद्यार्थी विशेष श्रेणी तर 22 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तिर्ण झाले आहेत. शाळेला   सुसज्ज व अद्ययावत प्रयोगशाळा, वस्तीगृह, शालेय इमारत व भोजन कक्ष यांची स्वतंत्र  व्यवस्था असून  विद्यार्थ्यांना खेळासाठी भव्य मैदाने  ,बास्केट बॉल ग्राउंड,  हॉलीबॉल ग्राऊंड, हँडबॉल ग्राउंड स्टेडियम ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे ही 'आदिवासी जनहिताय' बिरूदावली येथे  साथ॔ ठरवली जात आहे. उच्च दर्जाच्या शैक्षणिक साहित्यांमुळे विद्यार्थ्यांना  एनसीईआरटी चा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे पूर्ण करण्यास मदत होत असून   उच्चशिक्षित अनुभवी शिक्षकांमुळे शाळेने कला,क्रीडा  क्षेत्रात राज्य व देशपातळीवर  नावलौकिक मिळवला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे     प्राचार्य डॉ. देविदास राजगिरी शैक्षणिक संकुलातील सर्व मुख्याध्यापक,  शिक्षक,  अधीक्षक, अधीक्षिका यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 
      रात्रअभ्यासिका, विद्यार्थी पालकत्व , मार्गदर्शन व सराव या सारख्या उपक्रमांमुळे मुलांनी यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रकल्प अधिकारी  श्री.संतोष ठुबे , आदिवासी विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी निवासी अप्पर आयुक्त विकास पानसरे, अपर आयुक्त गिरीश सरोदे, उपायुक्त लोमेश  सलामे, उपायुक्त अविनाश चव्हाण, श्री.कलाथी नाथन्  श्री.प्रकाश आंधळे व एकलव्य सेल चे सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले असून  शाळासमिती अध्यक्ष, सदस्य ग्रामस्थ, पालक तसेच आमदार  डाॅ. किरण लहामटे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.