Breaking News

सर्वसामान्य कुटुंबातील सौरभ आवटे MPSC मध्ये OBC प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम !

सर्वसामान्य कुटुंबातील सौरभ आवटे MPSC मध्ये OBC प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम !
पारनेर/प्रतिनिधी : 
      MPSC च्या नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये पारनेर तालुक्यातील कर्जुले हरेश्वर येथील सर्वसामान्य कुटुंबातील सौरभ सुभाष आवटे याची MPSC ने राज्य उत्पादन विभागासाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये  उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.     
        महाराष्ट्रात सहावा तर OBC प्रवर्गातून पहिला आला असून पारनेर तालुक्याचे नाव नक्कीच उंचावले आहे. सौरभचे मित्रपरिवाराने व कर्जुले हरेश्वर ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात गावात स्वागत केले आहे. 
       सौरभचे ज्या महाविद्यालयात शिक्षण झाले, त्या श्री ढोकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य मतकर सर यांनी त्याचा सत्कार करून सन्मान केला. अगदी सर्वसामान्य कुटुंबातुन पुढे येऊन सौरभ आवटे यांनी जो यशाचा टप्पा गाठला आहे त्यामुळे त्याचे अभिनंदन होत आहे.