Breaking News

निघोज पतसंस्थेने १o१ सभासदांना १ कोटी १ लाखाचे व्यावसायिक कर्ज वितरण केले - वसंत कवाद

निघोज  पतसंस्थेने १o१ सभासदांना १ कोटी १ लाखाचे व्यावसायिक कर्ज वितरण केले - वसंत कवाद
निघोज/प्रतिनिधी :
  निघोज नागरी सहकारी पतसंस्थने  सध्या कोरोना व्हायरस मुळे बंद करण्यात आलेल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच पैकी छोट्या व्यवसायिकांना व्यवसाय चालु करण्यास परवानगी दिलेली आहे.परंतु त्यांचे जवळपास तीन चार महिने व्यवसाय बंद होते परंतु सध्या त्यांना व्यवसाय चालु करण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज असणाऱ्या व शासनाच्या मदतीपासुन वंचितअसणाऱ्या व्यावसायीकांच्या व्यवसायात काही प्रमाणात हातभार लागावा या सामाजिक भावनेतून संस्थेच्या वतीने मदत व्हावी म्हणुन  निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री.वसंत कवाद, व्हा चेअरमन मा श्री नामदेव थोरात व संचालक मंडळाने  १ लाखापर्यंत विनातारणी कर्ज फक्त  १२ टक्के व्याजाने रेडयुसिंग पद्धतीने देण्याचे धोरण घेतले. त्यामुळे व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी निघोज पतसंस्थेकडुन अल्प कालावधीत  १०१ सभासदांनी १ कोटी१ लाखाचे कर्ज घेतलेले असुन सदर  कर्जाची परतफेड रोजच्या धंदयातुन जमा करणाऱ्या डेली वरून नियमितपणे करत  आहे . त्यासाठी दोन वर्षाची मुदत दिलेली असून कर्जदारास दोन वर्षाला फक्त   १२७४५ / - रुपये व्याज भरावे  लागतआहे. 
      यामुळे व्यवसाय करण्यासाठी कमी व्याजदराने भांडवलाची उपलब्धता निर्माण झालेली आहे. तसेच हे वितरण करताना त्यांना अगदी एक ते दोन दिवसात त्यांच्या हातामध्ये पैसे मिळतील यासाठी त्यांना तात्काळ कर्ज मंजूर करून चेक देण्यात आलेले आहे .त्यामुळे परिसरामध्ये पतसंस्थेने संकट काळामध्ये मदत केल्याने संस्थेविषयी आपुलकी निर्माण होऊन त्या खातेदारांनी "आपली पतसंस्था निघोज पतसंस्था "असेच ब्रीदवाक्य त्यांचे तोंडुन परिसरात ऐकायला मिळत आहे .संस्थेच्या १३ शाखामधुन कर्ज वितरणाचे वाटप चालु आहे  . या योजनेचा सर्व व्यावसायिकांनी लाभ घ्यावा . असे आवाहन संस्थेचे  चेअरमन श्री वसंत कवाद , व्हा . चेअरमन श्री नामदेव थोरात , मुख्य कार्यकारीअधिकारी श्री दत्तात्रय लंके व संचालक मंडळाने केले आहे.