Breaking News

पारनेर तालुक्यात आज ६ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यात आज ६ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह !
पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या  खाजगी लॅबच्या अहवालानुसार ६ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाली आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
यामध्ये तालुक्यातील भाळवणी ३ कान्हूर पठार २ वाळवणे १ या गावांचा समावेश आहे कान्हूर पठार येथे कोरोना चा संसर्ग वाढत आहे दररोज येणाऱ्या अहवालात कान्हूर पठार येथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे
तर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६०० कडे गेली आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व सध्याचे हवामान हे इतर आजारांसाठी पोषक आहे कोरोना सदृश्य लक्षणे दिसताच त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी केले आहे.
ज्या गावांमध्ये कोरोना बाधित व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तेथील भागांमध्ये राहणाऱ्या कोरोना रुग्णांचा शंभर मीटर परिसरात हा कंटेनमेंट झोन घोषित करण्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.