Breaking News

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती 100 झाडे लावुन साजरी !

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती 100 झाडे लावुन साजरी 
जामखेड प्रतिनिधी :
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती शहरातील  साठेनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस उपाधिक्षक संजय सातव व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रा.मधुकर  राळेभात, काँग्रेसचे नेते तथा सावळेश्वर उद्योग समुहाचे रमेश आजबे, नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्या हस्ते१०० वृक्षांच्या रोपणाचा आरंभ करण्यात आला. 
काॅगेसचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांच्या तर्फे साठे नगर येथे नागरिकांसाठी बैठक बाक भेट देण्यात आले. 
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, साठे नगरचे अध्यक्ष किशोर कांबळे, वसीम बिल्डर कुरेशी,पांडुराजे भोसले, नगरसेवक अर्शद शेख,लखन मिसाळ, बगाडे गुरुजी, सोनू क्षीरसागर, दत्ता क्षीरसागर, संतोष थोरात, दादा डाडर,लखन गाडे,बाबु डाडर,शरद मोरे,मनीष घायतडक, मुकेश घायतडक, शेखर मोरे,करण डोलारे,सचिन काबळे, मनोज डाडर दादा अडागळेसह आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक अंतरासह आदी नियमांचे पालन केले गेले.