Breaking News

अगस्ती कारखान्याने सुरू केले १०० बेड'चे कोव्हिडं सेंटर !

अगस्ती कारखान्याने सुरू केले १०० बेड चे कोव्हिडं सेंटर


अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यतील कोरोनाचा चढता आलेख लक्षात घेत अगस्ती सहकारी साखर कारखान्याने १०० बेडचे कोविड सेंटर सुरु केले आहे.
अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने अगस्ती साखर
कारखान्याने कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे. १०० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर थाटले आहे. जास्त प्रादुर्भाव असलेल्यांसाठी विशेष खोल्या व
बेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे.


      अगस्ती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या  हस्ते आज या कोव्हिडं सेंटर चे उदघाटन करण्यात आले  यावेळी  अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर,  माजी आमदार वैभव पिचड तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे, कार्यकारी संचालक भास्करराव घुले यासह  संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते. अकोले तालुक्यात करोना बाधितांची संख्या पाच शतका पर्यंत पोहचली आहे तर को रोनाने १० बळी गेले आहे.