Breaking News

पारनेर तालुक्यात दिवसभरात 14 कोरोना बाधित, तालुक्याची कोरोना बधितांची संख्या 200 पार

पारनेर तालुक्यात दिवसभरात 14 कोरोना बाधित, तालुक्याची कोरोना बधितांची संख्या 200 पार
पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील कोरोना चा विळखा वाढत आहे तालुक्याने एकूण कोरोना बधितांची संख्या 200 पार केली आहे.
रॅपिड कॅटच्या चाचणी मध्ये पारनेर तालुक्यातील डिकसळ येथील 2 टाकळी ढोकेश्वर 2 धोत्रे, दरोडी व पारनेर प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
शासकीय लॅब च्या अहवालात पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये पारनेर 3 व्यक्ती हे पारनेर पोलीस स्टेशन मधील कैदी आहेत सुपा 2 रायतळे 1 गांजीभोयरे 1 दिवसभरातील कोरोना बधितांची एकूण संख्या ही 14 झाली आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
ज्या भागात कोरोना बाधित व्यक्ती सापडले आहे तो 100 मीटर परिसर कंटेनमेंट म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.
दरम्यान पारनेर येथील जेल मधील आरोपींना कोरोना ची बाधा होत आहे हि संख्या रोज वाढत आहे यापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत 13 कैदी पॉझिटिव वाढवले आहेत तर आज शासकीय लॅब च्या अहवालानुसार पुन्हा 3 कैदी पॉझिटिव आले आहेत एकूण 16 कैदी बाधित आले आहेत  त्यानंतर आज जेलमधील 38 कैद्यांना पुन्हा कोरोना संशयित लक्षणे आढळल्याने त्यांचे शासकीय लॅब साठी स्राव घेण्यात आले आहेत.
तर पारनेर जेल मधील 15 कैद्यांना पुढील उपचारासाठी राहुरी येथील कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
कोरोना संशयित जेलमधील रुग्णांची तपासणी पारनेरच्या आरोग्य अधिकारी डॉ.अभिलाषा शिंदे यांच्या पथकाने केली आहे.