Breaking News

राहुरी तालुक्यात एका दिवसात 16 नवीन कोरोना बाधित !

राहुरी तालुक्यात एका दिवसात १६ नवीन कोरोना बाधित !
राहुरी प्रतिनिधी : 
      राहुरी तालुक्यात एका दिवसात १६ नवीन कोरोना बाधित आले आढळून ! संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागाने केल्या होत्या अँटी जेन चाचण्या !!
राहुरी तालुक्यात आज ४ ऑगस्ट रोजी तब्बल १६ कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून कोरणा बाधितचा एकूण आकडा आता शंभरावर गेला आहे. 
      आज तांभेरे येथील रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी आरोग्य विभागाकडून घेण्यात आल्यानंतर सात पुरुष व साथ महिला अशा १३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. आरोग्य विभागाने अँटी जेन चाचण्या संपर्कातील व्यक्तींसाठी सुरू केल्याने  आज पॉझिटिव रुग्णांचा आकडा वाढला आहे . याशिवाय येथील दोन व्यक्ती तर मुसळवाडी येथील एक महिला अशा १६ कोरोना बागेत आढळून आले. तालुक्यातील एकूण  बाधितांचा आकडा ११३ वर गेला आहे . नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार एफ आर शेख. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, आरोग्य अधिकारी डॉक्टर नलिनी विखे , डॉ डोईफोडे, डॉ किरण खेसमाळस  आदींनी केले आहे