Breaking News

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात 19 कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात 19 कोरोना बाधित !
----
पारनेर पोलिस स्टेशन मधील अजून 13 कैद्यांना कोरोना ची लागण
----
तालुक्यात दोन दिवसांमध्ये 43 कोरोना बाधित अजूनही रॅपिड  तपासणी चालू
----
डॉ.अभिलाषा शिंदे यांचे रॅपिड चाचणीत उत्कृष्ट काम
रुग्णवाहिका ड्रायव्हर यांनी मदत केली
पारनेर प्रतिनिधी - 
    पारनेर तालुक्यामधील कोरोना ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आज पारनेर पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आलेल्या आरोपींची करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मधून 13 कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तर वाडेगव्हाण येथील 2 कान्हूर पठार भनगडेवाडी व पाडळी दर्या प्रत्येकी 1 रायतळे 1 असे अहवाल पॉजिटीव्ही प्राप्त झाले आहेत. अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
पारनेर पोलीस स्टेशन मधील 13 कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच कान्हूर पठार भनगडेवाडी व पाडळी दर्या प्रत्येकी 1 तसेच रायतळे 1 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव आला आहे. वाडेगव्हाण येथील 2 व्यक्तींचा खाजगी लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
  त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ही 19 वर गेली आहे.
अजूनही रॅपिड किट च्या माध्यमातून तपासण्या चालू आहेत ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. काल प्राप्त झालेल्या 24 अहवालानंतर आज 19 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तालुक्यात दोन दिवसांमध्ये 43 रुग्णांची उच्चांकी संख्या झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे समोर येत आहे तसेच समूह संसर्ग झाल्यामुळे हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता आता वाढली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमा चे पालन करावे तसेच कोणाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असतील तर त्यांनी त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केली आहे.