Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज 18 कोरोना बाधित !

कोपरगाव तालुक्यात आज 18 कोरोना बाधित !
करंजी प्रतिनिधी- 
आज कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १०१ संशयितांच्या रॅपिड अँटिझन टेस्ट केल्या त्यात एकूण १८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती कोपरगाव तालुका ग्रामिण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले आहे
 यात प्रामुख्याने कोपरगाव शहरातील विविध भागात एकूण १२ रुग्ण सापडले असून यात टिळेकर वस्ती-२, संजयनगर-२, बैलबाजार रोड-४, सुभाष नगर-१, महादेवनगर-१, शंकर नगर-१, टिळकनगर-१ या भागात   कोपरगाव शहरात रुग्ण सापडले आहे.
   तर तालुक्यातील मंजूर गावात-३, संजीवनी परिसरात-२ तसेच धरणगाव या ठिकाणी १ रुग्ण सापडला आहे.
 आतापर्यंत तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या १३५ झाली असून सध्या ऍक्टिव्ह उपचार घेत असलेले रुग्ण ८९ असून आता पर्यंत उपचार करून पूर्ण पणे बरे होऊन घरी सोडलेले ४५ रुग्ण आहे.