Breaking News

राहाता नगरपालिकेला लागले कोरोनाचे ग्रहण ! आज एकूण 21 कर्मचारी निघाले कोरोना पॉझिटिव्ह! शहरात खळबळ!राहता प्रतिनिधी :
राहाता नगरपालिकेला कोरोनाचे ग्रहण लागले असून आज मंगळवार
दिनांक 25 ऑगस्ट रोजी राहता नगरपालिकेतील 21 कर्मचारी कोरोणा
बाधित निघाले आहेत ,त्यामुळे राहता नगरपालिकेतील इतर
कर्मचाऱ्यांमध्ये ही मोठी खळबळ निर्माण झाली आहे , राहता शहरात
आज कोरोनाच्या टेस्ट होत आहेत, आज दुपारपर्यंत एकूण 72 कोरोना
च्या तपासण्या करण्यात आल्या विशेष म्हणजे यामध्ये राहता
नगरपालीकेतीलच 21 कर्मचारी कोरोणा बाधित आढळून आल्या
आहेत, या कोरोणा बाधित व्यक्तींमध्ये राहता नगरपालिकेतील विविध
विभागात काम करणारे हे कर्मचारी आहेत,अशी माहिती राहता
तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे, राहता नगरपालिकेला आता
कोरोनाचे ग्रहण लागले आहे, राहता नगरपालिकेतील एकूण 21 कोरोना
बाधित कर्मचारी आज मंगळवारी दुपारपर्यंत आढळून आल्यामुळे राहता
नगरपालिकेतील इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये त्या मुळे मोठी
खळबळ निर्माण झाली आहे, तसेच राहता शहरातही त्यामुळे मोठी
खळबळ व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत
आहे, कोरोणाच्या काळात व लॉकडाउन च्या काळात राहता
नगरपालिकेतील कर्मचारी।कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठे
परिश्रम घेत होते व घेत आहेत,अश्या
परिस्थितीत राहाता नगरपालिकेचेच 21 कर्मचारी कोरोणा पॉझिटिव्ह
आढल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, राहता शहरात अजूनही
कोरोनाच्या टेस्ट चालू असून अजूनही कोरोना बाधितांच्या नवीन रुग्ण
संख्येत भर पडण्याची शक्यता आहे,
मात्र राहता शहरातील नागरिकांनी ,राहता नगर पालिकेच्या
कर्मचाऱ्यांनी घाबरून जाऊ नये, कोरोना ची लक्षणे आढळल्यास त्वरित
ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांशी संपर्क करावा, नागरिकांनी विनाकारण
कुठे गर्दी करू नये, मास्क वापरावे, सामाजिक दुरी चे अंतर ठेवावे, अस
आवाहनही राहता तहसिलदार कुंदन हिरे यांनी केले आहे,