Breaking News

पारनेर तालुक्यातील आज दिवसभरात प्राप्त झालेले 22 अहवाल पॉझिटिव्ह 62 अहवाल निगिटिव्ह !

पारनेर तालुक्यातील आज दिवसभरात प्राप्त झालेले २२ अहवाल पॉझिटिव्ह ६२ अहवाल निगिटिव्ह !
------------
सुपा, टाकळी ढोकेश्वर, जवळा, कान्हूर पठार, कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे !
------------
तालुक्यातील ६२ अहवाल निगिटिव्ह आल्याने काहीसा दिलासा !
------------


पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यातील आज दिवसभरात प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालात २२ अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत तर ६२ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये तालुक्यातील सुपा ५ सिद्धेश्वर वाडी २ जवळा २ कान्हूर पठार १ दरोडी २ करुंद १ पारनेर ३ टाकळी ढोकेश्वर ३ हंगा १ राळेगण सिद्धी १ पुणेवाडी १ या गावाचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
तर तालुक्यातील ६२ अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाले आहे त्यामध्ये पारनेर २१ कळस ७ सुपा १४ कान्हूर पठार ५ कळस २ जवळा ४ निघोज २ हंगे ६ भांडगाव १ किंन्ही १ गुणोरे १ या गावांचा निगिटिव्ह अहवालात समावेश आहे.
तालुक्यातील जवळा व कान्हूर पठार येथे कोरोना बधितांची संख्या वाढली आहे तर आज प्राप्त झालेल्या अहवालात पारनेर शहरातील २१ अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे पारनेरकरना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील ज्या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत ते रुग्ण राहत असलेला १०० मीटर चा परिसर १४ दिवसासाठी कंटेन्मेंट झोन घोषित करण्याचे आदेश तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.