Breaking News

तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित !

पारनेर भाजी मंडईतील किराणा दुकानदाराच्या  संपर्कात आलेल्या व्यक्तींची आज रात्री रॅपिड चाचणी !

तालुक्यात आज 25 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर शहरातील किराणा दुकानदार कोरोना बाधित !

पारनेर शहरात पाहिला कोरोना बाधित ;आतापर्यंत पारनेर शहर कोरोना पासून होते दूर
---
पारनेर तालुक्यात दोन दिवसात गाठला पन्नाशीचा आकडा !
--   
किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेले व्यक्तींनी त्वरित रॅपिड चाचणी करून घ्यावी तहसीलदार ज्योती देवरे यांचे अहवान
पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यात कोरोना आलेख वाढत आहे. काल 24 रुग्ण बाधित  सापडल्या नंतर आज हा आकडा पुन्हा 25 वर गेला आहे यामध्ये पारनेर पोलीस स्टेशन मधील 12 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे तर 
पारनेर 1 भाळवणी 1  कन्हूर पठार 1 रायतळे 1  हंगे 3 सुपा 2  वाडेगव्हाण 2 पाडळी दर्या 1 भनगडेवाडी 1 पोलीस स्टेशन कैदी 12 असे एकूण 25 बाधित आज दिवसभरात तपासणीतून समोर आले आहेत अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे. 
आज रॅपिड चाचणीच्या माध्यमातून पारनेर आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. अभिलाषा शिंदे यांनी आपल्या पथकासह पारनेर पोलीस स्टेशन मधील कैद्यांची चाचणी केली तसेच रुई छत्रपती येथील आरोग्य केंद्राच्या डॉ. अश्विनी गुंजाळ यांनी ही कालच प्रमाणे आजही मोठ्या प्रमाणात रॅपिड चाचणी केली.  तालुक्यात कोरोना संशयित व्यक्ती सापडण्यास मदत झाली व त्या व्यक्तींना वेळीच उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. त्यामुळे डॉ. शिंदे डॉ. गुंजाळ यांनी केलेल्या कामाबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच तालुक्यातील इतर आरोग्य केंद्रातील अधिकर्यांनी देखील आता रॅपिडच्या मार्फत संशयितांची कोरोना चाचणी करावी असे आवाहन तहसीलदार  ज्योती देवरे यांनी केले आहे.
दरम्यान शहरातील किराणा दुकानदार बाधित सापडल्यानंतर तहसीलदार यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की ज्यांना कोणाला दुकानदाराच्या संपर्कात आले असतील व त्यांना काही कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असतील तर त्यांनी त्वरित समोर येऊन रॅपिड चाचणी करून घ्यावी आज रात्री भाजी मंडई येथे रॅपिड चाचणी केली जाणार आहे असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले
 पारनेर मध्ये पहिलाच स्थानिक किराणा दुकानदार  कोरोना बाधित आढळला आहे तसेच हा व्यक्ती पारनेर पेठेत राहत असल्याचे माहिती समोर येत आहे . त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर बाजारपेठ तील दुकाने 24 तास बंद करण्याचे आदेश दिले, तसेच बाधीत व्यक्ती असलेला 100 मीटर परिसर 14 दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.