Breaking News

पारनेर तालुक्यात 23 अहवाल पॉझिटिव्ह, शहरातील तीन व्यक्ती कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यात 23 अहवाल पॉझिटिव्ह, शहरातील तीन व्यक्ती कोरोना बाधित !
------------------
जवळा व कान्हूर पठार येथे वाढत आहे कोरोना चा संसर्ग
पारनेर प्रतिनिधी - 
      पारनेर तालुक्यातील दि. २० रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार २३ जणांना कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
यामध्ये तालुक्यातील भाळवणी ३, कान्हूर पठार ५, वाळवणे १, पारनेर शहर ३,  गुणोरे ३,  हंगे २, पिंपळगाव तुर्क १, टाकळी हाजी १, रांजणगाव मशीद १, शहाजापूर १, देवीभोयरे १, जवळा १ या गावांचा समावेश आहे कान्हूर पठार येथे कोरोना चा संसर्ग वाढत आहे दररोज येणाऱ्या अहवालात कान्हूर पठार येथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.
तर शासकीय लॅब च्या अहवालानुसार तालुक्‍यातील १८ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे यामध्ये पारनेर शहर ९ निघोज ६ सुपा २ किंन्ही १ यांचा समावेश आहे
तर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६०० वर पोहचली आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व सध्याचे हवामान हे इतर आजारांसाठी पोषक आहे कोरोना सदृश्य लक्षणे दिसताच त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी केले आहे.
तालुक्‍यातील ज्या गावांमध्ये आज कोरोना चाचणी अहवालात पॉझिटिव्ह आले आहेत ज्या ठिकाणी रुग्ण राहत होते तो १०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.