Breaking News

सोनियांना पत्र लिहिणारे 23 नेते भाजपशी मिळालेले!

Rahul Gandhi's New Attack Over Rafale Deal Invites Scathing BJP Retort

 - राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

- ज्येष्ठ काँग्रेसनेते खवळले

नवी दिल्ली/ विशेष प्रतिनिधी 

काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीपूर्वीच काँग्रेसच्या ज्या 23 ज्येष्ठ नेत्यांकडून हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिण्यात आले होते. त्या सर्व नेत्यांवर राहुल गांधी यांनी टीका करत हे सर्व नेते हे भाजपशी मिळालेले आहेत, असा गंभीर आरोप केला. त्यामुळे हे नेतेदेखील खवळले असून, त्यांनी राहुल यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

सोनिया गांधींना पत्र लिहिणार्‍या 23 नेत्यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लक्ष्य केले. ते म्हणाले की, जेव्हा पक्ष राजस्थान आणि मध्य प्रदेशात विरोधी शक्तींशी लढत होता, त्यावेळी सोनिया गांधी अस्वस्थ होत्या. तेव्हा असे पत्र का नाही लिहिले गेले? राहुल गांधींच्या या टीकेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच दिसून आली. सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. अशातच काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीला हादरा देणारे विधान केले आहे. गांधी घराण्यानेच नेतृत्त्व करावे. सोनिया गांधी यांनी नकार दिल्यामुळे राहुल गांधी हे नेतृत्त्व करण्यास सक्षम आहे. काँग्रेसच्या राज्याच्या कार्यकारी अध्यक्ष तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे, अशी मागणी केली आहे.

------------------------