Breaking News

पारनेर तालुक्यात दिवसभरात २८ कोरोना बाधित, भाळवणी येथील डॉक्टरला कोरोना ची लागण !

पारनेर तालुक्यात दिवसभरात २८ कोरोना बाधित, भाळवणी येथील डॉक्टरला कोरोना ची लागण !
------------
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील डॉक्टर पतिपत्नी सह मुलगी कोरोना बाधित
------------
देवीभोयरे येथील एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोना ची बाधा
किन्ही येथील ३५ वर्षीय महिलेचा कोरोना मुळे मृत्यू !
पारनेर प्रतिनिधी-  
  पारनेर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना चा आलेख वाढत आहे वाढता आलेख तालुक्यासाठी चिंतेचा विषय होत आहे. पारनेर तालुक्यातील देवीभोयरे ८,पाठरवाडी ४,निघोज ३, कान्हूर पठार २,  पाडळी १, वाडेगव्हाण १, सांगवी सूर्या १, बुगेवाडी १, सुपा १, पिंपळगाव रोठा १,भाळवणी ३  कार्जुले हर्या १ असे एकूण २८ अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. 
दरम्यान रात्री ९ वाजे पर्यत पारनेर तालुक्यातील कोरोना बाधित संख्या २५ होती त्या नंतर ३ अहवाल पॉजिटीव प्राप्त झाले आहे संख्या आता २८ झाली आहे .
     यामध्ये देवीभोयरे येथील एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींचा समावेश आहे तसेच भाळवणी येथील एका डॉक्टर व त्यांच्या लहान मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
ज्या भागांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे तो १०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे तसेच सध्या वाढत असलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील नागरिकांनी स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे असून लक्षणे दिसतात आरोग्य विभागाशी संपर्क साधावा व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.
दरम्यान किन्ही येथे कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे किन्ही येथील किराणा दुकानदाराच्या कुटुंबात कोरोना चा संसर्ग वाढला आहे कुटुंबातील 35 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे दि ६ रोजी मृत्यू झाला ही महिला काही दिवसांपासून आजारी होती दि. ४ रोजी तिची कोरोना चाचणी केल्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला त्यानंतर तिला पारनेर कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तिथे तिची प्रकृती बिघडल्याने तिला नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यामुळे तालुक्यात व परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.