Breaking News

राहूरी पोलिसांनी दुचाकी चोरणारी टोळी पकडली, चार आरोपींना 27 पर्यंत पोलीस कोठडी !

राहूरी पोलिसांनी दुचाकी चोरणारी टोळी पकडली, चार आरोपींना 27 पर्यंत पोलीस कोठडी !


राहुरी शहर प्रतिनिधी :
    राहुरी शहरानजीक असलेल्या मनमाड ते अहमदनगर महामार्गावर मुळा नदीचे पुलाजवळ काही इसम दरोडा घालण्याच्या तयारीने एकत्र आलेले असुन ते संशयीतरिया फिरत आहे. अशी गुप्त बातमी पोलीस निरीक्षक  मुकुंद देशमुख यांना मिळाल्याने त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला , यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल व पोलीस उप  निरीक्षक गणेश शेळके, आयुब शेख, शिवाजी खरात, संभाजी शेंडे, निलेश मेटकर, आदिनाथ पाखरे, सचिन ताजणे, श्रीकृष्ण केकाण, रंगनाथ ताके यांनी सदर घटनास्थळी जावून दबा धरून बसले असता सदर पुलाच्या अलीकडे पोस्टमार्टेम रूमचे जवळ हायवेच्या नजीक ५ ते ६ इसम हे दोन मोटार सायकलीवर संशयास्पदरित्या हालचाली करीत असताना दिसून आले. त्यावेळी पोलीस पथकास पाहून ते सैरावैरा पळू लागले. सदरचे इसम मुळा  नदीच्या दिशेने पळून जात असताना पोलीस पथकाने त्यांना पाठलाग करून त्यातील चार इसमांना पकडले. 
     परंतु दोन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर यांना राहुरी पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्याची नांवे  १ ) सागर अशोक बर्डे बय २० वर्षे २) राहुल पोपट आधाव वय १९ वर्षे ३) रविंद्र सूर्यभान माळी उर्फ भोन्द्या वय २१ वर्षे ४) विनायक गणपत बड़े वय १९ सर्व रा. बारागाव नांदूर ता. राहुरी जि-  अहमदनगर असे सांगितले. त्यावेळी त्यांजबरोबर असणारे इतर दोन साथीदार अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेलेले असुन त्याची नावे १) अर्जुन साहेबराव माळी २) राहुल अशोक माळी दोन्ही रा. बारागाव नांदूर ता. राहुरी असे असल्याचे सांगितले त्यांची अंगझडती घेतली असता आरोपिकडे एक चाकु, नायलॉन दोरी, स्कू व मिरची पुड व दोन चोरीच्या हिरो
स्पेंडर मोटार सायकल न. MH १७AU ३४५८ व बजाज प्लटीना मो.सा. नं. MH १७ W १६६९ ह्या मिळुन आलेल्या असुन त्यांनी आम्ही नगर मनमाड महामार्गावर मुळा नदीवर असलेल्या पुलाजवळ एखादे वाहन थांबवून दरोडा दरोडा टाकण्याचे तयारीने आलो असले
बाबत सांगितले.  
    आज सदर आरोपिना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. २७ ऑगस्ट  पर्यंत पोलीस कोठडी चे आदेश दिले . राहुरी पोलिसांनी  आरोपीकडून आठ चोरीच्या मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या असून मालाविरुध्दचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 
    सदर गुन्हेगार हे सराईत असून मोटार सायकल चोरी, घरफोडी अशा प्रकारचे गुन्हे करण्यात पटाईत आहेत. जंगल परिसरात राहून मोटार सायकल चोरून ठराविक दलालांच्या माध्यमातून पैशाची मागणी करतात. अनेक दिवसापासून पोलीस त्यांचा शोध घेत
होते. परंतु ते वेळोवेळी पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात असत. सदरहु इसम हे घातक हत्यारे व दुचाकीसह दरोडा घालण्याच्या
तयारीने एकत्र जमलेले मिळुन आल्याने त्यांचेविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशनला गुरनं ९७७/२०२० भा.दं.वि. कलम ३९९, ४०२ अन्वये
गुन्हा रजिस्टरी दाखल केलेला असुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरहून गुन्ह्याचा तपास पो.नि. श्री
मुकुंद देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बागुल हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. अखिलेश कुमार सो पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा श्रीमती डॉ. दिपाली काळे सो अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व मा. श्री. राहुल मदने सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो. श्रीरामपुर भाग श्रीरामपुर यांचे सुचना
व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पो.नि. श्री. मुकुंद देशमुख, सपोनि सचिन बागुल, पोसई गणेश शेळके, पोहेका आयुब शेख,
पोना शिवाजी खरात, पोना संभाजी शेंडे, पोना निलेश मेटकर, पोकों आदिनाथ पाखरे, पोकों सचिन ताजणे, पोकों श्रीकृष्ण केकाण,
पोकों रंगनाथ ताके यांनी केलेली आहे.