Breaking News

पारनेर तालुक्यात आज नवीन ३ व्यक्ती कोरोना बाधित, १६ अहवाल निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यातील ३ व्यक्ती कोरोना बाधित, १६ अहवाल निगेटिव्ह !

जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत पारनेरमध्ये होणार पहिले महिला कोविड केअर सेंटर !

माजी आमदार नंदकुमार झावरे सचिव जी डी खानदेसे व माजी सभापती राहुल झावरे यांची संकल्पना
120 बेडचे असणार आहे महिला कोविड सेंटर तहसीलदार ज्योती देवरे यांची माहिती
पारनेर प्रतिनिधी - 
      पारनेर तालुक्यातील शासकीय लॅब मध्ये कोरोना चाचणी स्राव तपासणी साठी पाठवले होते त्यात 5  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
मात्र त्यातील पारनेर येथील एका 32 वर्षीय महिलेचा व डिसकळ येथील 14 वर्षीय मुलाचा अहवाल दोन दिवसापूर्वी रॅपिड चाचणी मध्ये पॉझिटिव्ह आला होता.
तर नवीन तीन रुग्णां मधील वाडेगव्हाण येथील २३ वर्षीय देवीभोयरे येथील ४२ वर्षीय पाडळी येथील ६३ वर्षीय व्यक्तींचा यात समावेश आहे.
तर डिसकळ ४ वाडेगव्हाण ४ भांडगाव १ पारनेर १ कान्हूर पठार १ किंन्ही  ३ दैठणे गुंजाळ १ रुई छत्रपती १ या गावांतील १६ व्यक्तीचा निगिटिव्ह अहवालात समावेश आहे.
    सकाळी १० वाजता नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने महिलांसाठी नगर जिल्ह्यातील पहिले कोविड उपचार सेंटर संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार नंदकुमार झावरे, सचिव जी डी खानदेशे याच्या पुढाकारातुन राजमाता जिजाऊ वसतिगृह १२० बेड ऑक्सिजन व सर्व सुविधा युक्त तयार करून दिले आहे. अशी माहिती माजी सभापती राहुल झावरे यांनी दिली आहे तेथे फक्त महिला कोरोना रुग्ण ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे फक्त महिला कोविड केअर सेंटर हा कदाचित महाराष्ट्रातील पाहिला प्रयोग आहे.