Breaking News

पारनेर तालुक्यात ३ व्यक्ती कोरोना बाधित,तालुक्यातील तहसिल कार्यालयातील अधिकारी कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यात ३ कोरोना बाधित,तालुक्यातील तहसिल कार्यालयातील अधिकारी कोरोना बाधित !
----------
पारनेर शहरांतील वरखेड मळा येथील १ तरुण कोरोना बाधित !
----------
तालुक्यातील २९ अहवाल निगिटिव
पारनेर प्रतिनिधी -
     पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालात तीन व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे
यात पारनेर तालुक्यातील तहसिल कार्यालयातील अधिकारी यांचा समावेश आहे. पारनेर शहरातील  २६ वर्षीय तरुणाचा व पिंपळगाव तुर्क येथील ३४ तरुणाचा पॉझिटिव्ह समावेश आहे.
 तहसिल कार्यालयातील अधिकारी पॉझिटीव्ह आल्यानंतर तहसील कार्यालयाची इमारत सेनीटायझर करण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी साठी स्राव घेण्यासाठी तहसील कार्यालय एक दिवस बंद करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत

तर तालुक्यातील पारनेर १७ रायतळे ३ नांदूर पठार ३ वडझिरे २ कळस २ दैठणे गुंजाळ १ सांगवी सूर्य १ असे २९ अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
ज्या ठिकाणी कोरोना बाधित व्यक्ती सापडले आहेत तो १०० मीटर परिसर १४ दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहे.