Breaking News

पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथे ३१ वर्षीय महिलेची आत्महत्या !

पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथे ३१ वर्षीय महिलेची आत्महत्या !
पारनेर प्रतिनिधी - 
     तालुक्यातील गाडीलगाव येथील खानेबावस्ती येथे एका ३१ वर्षीय महिलेने राहत असलेल्या कोपी मध्ये बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१८ रोजी ६ ते ८ वा. दरम्यान मयत यशोदा काशिनाथ मधे वय ३१ वर्ष मूळ राहणार वारणवाडी टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हल्ली राहणार खानेबावस्ती गाडीलगाव तालुका पारनेर हिने निळे रंगाचे स्कार्पने कोपीचे आड्याचे बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला माहिती भाऊसाहेब यादव मधे वय २७ वर्ष धंदा मजुरी मूळ राहणार वारणवाडी टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हल्ली राहणार खानेबावस्ती गाडीलगाव तालुका पारनेर याने दिली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानुसार पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली चौगुले करत आहेत.
दरम्यान ही आत्महत्या कोपी मध्ये बांबूला गळफास घेऊन करण्यात आली मात्र कोपी ची उंची कमी असल्याने आत्महत्या कशी केली आत्महत्या की घातपात पोलीस तपासात निष्पन्न होईल मात्र ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्याच परिसरामध्ये मोठा पत्त्याचा डाव चालत असल्याची माहिती समोर येत आहे नेमके याबाबत देखील आता चौकशी होईल.