Breaking News

पारनेर तालुक्यात आज ३८ कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यात आज ३८ कोरोना बाधित !
पारनेर प्रतिनिधी -
     पारनेर तालुक्यात आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालात ३८ उच्चांकी कोरोना बाधितांची संख्या समोर आली आहे आज दिवसभरात प्राप्त झालेल्या एकूण अहवालात ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
यामध्ये रात्री प्राप्त झालेल्या अहवालात १६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत यात पारनेर जेल मधील १२ कैद्याचा अहवालात  समावेश आहे तर पारनेर शहर, टाकळीढोकेश्वर व रुई छत्रपती येथील प्रत्येकी १ व्यक्ती'चा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे. तर ३० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत यात पारनेर येथील २९ व सुपा येथील १ अहवालाचा समावेश आहे.
      दरम्यान संध्याकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात पारनेर शहर ७,टाकळी ढोकेश्वर ५,सुपा २, वाडेगव्हाण १, किन्ही १, म्हसणे १, सांगवी सुर्या २, पारनेर जेलमधील कैदी १, म्हसणे १,  जामगाव १, निघोज १, व्यक्तींचा समावेश आहे. असे संध्याकाळ पर्यंत एकूण २३ जणांचा समावेश होता. त्यानंतर रात्री आलेल्या अहवालात १५ व्यक्तीचा समावेश आहे.
पारनेर तालुक्यातील एकूण आज दिवसभरातील कोरोना बधितांची संख्या आता ३८ वर गेली आहे.
     ज्या परिसरात कोरोना बाधित व्यक्ती आढळला  आहे तो १०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहेत.