Breaking News

राजू शेट्टींसह बारामतीत 40 जणांवर गुन्हा दाखल !


Swabhimani Shetkari Sanghatana exits NDA

बारामती :

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी  काल बारामतीत दुधाच्या भुकटीच्या आयात बंदी आणि दूध दर वाढ दिली जात नसल्याच्या निषेधार्थ राज्य सरकार विरोधात मोर्चा काढला होता. परंतु, मोर्चाला परवानगी नसताना देखील कोरोना काळातील नियमांचं उल्लंघन करत गर्दी जमवल्याच्या आरोपावरुन आज बारामतीत राजू शेट्टी आणि अन्य चाळीस जणांवर विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राजू शेट्टी यांनी काढलेल्या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परंतु, या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. तोंडाला मास्क लावले नव्हते. मोर्चाला परवानगी नाकारली असताना देखील बेकायदा जमाव जमवून घोषणाबाजी आणि भाषणे झाली. त्यामुळे कोरोना काळ असून देखील जमावाच्या आरोग्याला बाधा होईल, असं कृत्य केल्याची फिर्याद पोलीस कर्मचारी ओंकार सिताप यांनी दिली. त्यावरुन आज बारामती शहर पोलीस ठाण्यात माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या अन्य 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली. राजू शेट्टींचा दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काल (28 ऑगस्ट) बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना राज्य सरकारव टीकास्त्र सोडलं. 'आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधाने आंघोळ घाला', असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं. 

'आम्हाला जास्त जनावरं आणायची होती, पण पोलिसांनी अडवलं. आम्हाला अडवायचा पोलिसांना अधिकार आहे. मात्र आमच्यावर ही वेळ का आली? याचा विचार करा. गोमूत्राची किंमत 110 रुपये लिटर, शेण विकलं जातं. पण आमच्या दुधाला किंमत नाही. गाढविनीच दूध 1 हजार रुपये लिटर किंमतीनं मिळतं. पण सत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही?', असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.