Breaking News

अज्ञात 5 दरोडेखोरांचा खरवंडी कासार मध्ये शसस्त्र दरोडा !

अज्ञात 5 दरोडेखोरांचा खरवंडी कासार मध्ये शसस्त्र दरोडा
खरवंडी कासार प्रतिनिधी:
     तालुक्यातील खरवंडी कासार येथील केळगंद्रे वस्तीवर रविवारी रात्री १ च्या सुमारास अज्ञात ५ दरोडेखोरांनी शसस्त्र दरोडा टाकून रोख रक्कम 1 लाख 85 हजार व सुमारे 80 हजारांचे दागिने असा एकूण 2 लाख 65 हजारांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला आहे. 
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह,अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील ,शेवगाव  उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
 त्यानंतर पोलीस निरीक्षक रामेश रत्नपारखी,सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांना तपासा बाबत सूचना केल्या.
 पांडुरंग तानाजी केळगंद्रे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात पाच अनोळखी दरोडेखोरां विरुद्ध  दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दागिने व पैसे काढून द्या, नाही तर मुलांना मारून टाकू अशी धकमी दरोडेखोरांनी देऊन घरातील महिलांच्या अंगावरील दागिने, कपाटातील रोख रक्कम व  ऐवज शस्त्राचा धाक दाखवून हे दरोडेखोर पसार झाले.