Breaking News

पारनेर तालुक्यात 5500 रुपयाची हातभट्टी जप्त, एक आरोपी अटक एक फरार !

पारनेर तालुक्यात 5500 रुपयाची हातभट्टी जप्त, एक आरोपी अटक एक फरार !


पारनेर प्रतिनिधी-
      पारनेर तालुक्यातील भाळवणी वडझिरे या दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मध्ये गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आले असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे तर एक आरोपी फरार झाला आहे.
     याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाळवणी येथे आरोपी रुपेश बापूसाहेब तोडमल (फरार) भाळवणी तालुका पारनेर गावात आरोपीचे घराचे आडोशाला 3000 रु की ची 30 ली. गावठी हातभट्टीची तयार दारू विनापरवाना बेकायदा स्वतःची आर्थिक फायदे करिता वरील वर्णनाची किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू स्वतःचे कब्ज्यात बाळगताना व विक्री करताना मिळून आला व पोलीस व पंचांना पाहून पळून गेला आहे याबाबत पो.हे.कॉ. विजयकुमार बाळासाहेब वेठेकर स्था. गु. शा. जि. अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ पंधरकर करत आहेत
तसेच वडझिरे येथे आरोपी भीमा रामचंद्र लंके वय 60 रा वडझिरे तालुका पारनेर (अटक) वडझिरे गावात आरोपीचे घराचे आडोशाला 2500 रु की ची 25 ली गावठी हातभट्टीची तयार विनापरवाना बेकायदा स्वतःच्या आर्थिक फायदे करिता वरील वर्णनाची किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू स्वतःचे कब्ज्यात बाळगताना व विक्री करताना मिळून आला आरोपीला अटक करण्यात आले आहे याबाबतची फिर्याद पो.हे. कॉ सागर नारायण सुलाने स्था. गु. शा.  जि. अहमदनगर यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. उजगरे करत आहेत.