Breaking News

पारनेर तालुक्यात 6 व्यक्तींना कोरोना ची बाधा !

पारनेर तालुक्यात 6 व्यक्तींना कोरोना ची बाधा !
-------
पारनेर जेल मधील कैद्यांना कोरोना ची बाधा !
------
पारनेर प्रतिनिधी -
      पारनेर तालुक्यामधील कोरोना ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मधून 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तर वाडेगव्हाण येथील 2 व्यक्तींचे अहवाल हे खाजगी लॅब मधून पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
पारनेर पोलीस स्टेशन मधील तीन कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच कान्हूर पठार येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव आला आहे . वाडेगव्हाण येथील दोन व्यक्तींचा खाजगी लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
दरम्यान वाडेगव्हाण येथील बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा सर्वे करण्यासाठी गेलेल्या पथकाला शिवीगाळ व दमबाजी करण्यात आली असल्याची माहिती डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे. त्यानुसार तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलिसांना याबाबत पुढील कारवाईच्या सूचना केल्या आहेत.