Breaking News

अहमदनगर जिल्ह्यात आज पर्यंत 6250 रुग्ण बरे होऊन घरी, बरे होण्याची टक्केवारी ही 64.25 टक्के !

अहमदनगर जिल्ह्यात आज पर्यंत 6250 रुग्ण बरे होऊन घरी, बरे होण्याची टक्केवारी ही 64.25 टक्के !
-----
आज सायंकाळी सहा वाजे पर्यंत रूग्ण संख्येत 483 ने वाढ झाली.
---------------
आजपर्यंत 6250 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
--------------
जिल्ह्यात आज 384 रुग्ण बरे होऊन घरी परतले 
------
 रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 64.25 टक्के इतकी
-------------
आज एकूण 384 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
अहमदनगर|प्रतिनिधी :
     जिल्ह्यात आज 384 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत 6250 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 64.25 टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहावाजेपर्यंत रूग्ण संख्येत 483 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3367 इतकी झाली आहे.
     जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 41 रुग्ण बाधित आढळून आले. बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 23, संगमनेर 01, राहाता 01, नगर ग्रामीण 10, कँटोन्मेंट 01, नेवासा 02, शेवगाव 01 आणि कोपरगांव 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
    अँन्टीजेन चाचणीत आज 257 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर 33, राहाता 22, पाथर्डी 48, नगर ग्रामीण 13, श्रीरामपुर 06, कॅन्टोन्मेंट 21, नेवासा 21, श्रीगोंदा 21, पारनेर 11, अकोले 04, राहुरी 10, शेवगाव 09, कोपरगाव 04, जामखेड 10 आणि कर्जत 24 अशा रुग्णांचा समावेश आहे.
     खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 185 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 147, संगमनेर 09, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 08, श्रीरामपूर 03, कॅन्टोन्मेंट 04, नेवासा 01, श्रीगोंदा 01, पारनेर 02, अकोले 02, राहुरी 05, शेवगाव 01 आणि कोपरगाव 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
     दरम्यान, आज एकूण 384 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा 172, संगमनेर 23, राहाता 3, पाथर्डी 27, नगर ग्रा.16, श्रीरामपूर 18, कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 21, श्रीगोंदा 18, पारनेर 10, अकोले 4, शेवगाव 14, कोपरगाव 39, जामखेड 5, मिलिटरी हॉस्पीटल 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.