Breaking News

कोरोना मुळे पारनेर तालुक्यातील डिसकळ येथील ६७ वर्षीय व्यक्ती चा मृत्यू !

कोरोना मुळे पारनेर तालुक्यातील डिसकळ येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !
---------------
आठ दिवसापूर्वी त्यांचा  कोरोना चाचणीमध्ये  अहवाल आला होता पॉझिटिव
पारनेर प्रतिनिधी -  
      पारनेर तालुक्यातील डिसकळ येथे आठ दिवसापूर्वी कोरोना चाचणी अहवालामध्ये पॉझिटिव आलेल्या ६७ वर्षीय व्यक्तीचे नगर येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.
       पारनेर तालुक्यातील डिसकळ येथील ६७ वर्षीय व्यक्ती कोरोना चाचणी अहवालात आठ दिवसापूर्वी पॉझिटिव प्राप्त झाले त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या व्यक्तीला इतर शारीरिक आजार असल्याने व त्रास जाणवत असल्यामुळे नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते तेथे उपचार घेत असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे.
    कुटुंबातील तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.