Breaking News

पारनेर तालुक्यात आज दुपारपर्यंत १५ कोरोना बाधित, तालुक्यातील देवीभोयरे येथील आठ जणांना कोरोनाची बाधा !

पारनेर तालुक्यात  दुपारपर्यंत १५ कोरोना बाधित !
----------
किन्ही येथील कोरोना मुळे ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू !
-----------
पारनेर शहरात आज दुपारपर्यंत नवीन एकही कोरोना बाधित नाही
---------
पठारवाडी येथील एक जण कोरोना पॉजिटीव्ह..
पारनेर प्रतिनिधी - 
       देवीभोयरे ८, निघोज ३, कान्हूर पठार २,  पाडळी १, वाडेगव्हाण १, असे एकूण १५ अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. तर किन्ही येथील कोरोना मुळे ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे ती अहमदनगर येथील  शासकीय रुग्णालयात उपचार घेत होती तिचा आज सकाळी मृत्यू झाला असल्याची  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
   पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील आठ जणांना कोरोना ची बाधा झाली आहे. निघोज  ७५ वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला असे तीन तर  (पारनेर) सांगवी सूर्या २६ वर्षीय एक तरुण, कानूर पठार येथील २२ वर्षीय तरुण, व २१ वर्षीय तरुणी यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. पारनेर पत्ता झाला असलेला तरुण हा सांगवी सूर्या येथील आहे या तरुणाची दोन दिवसांपूर्वीचा रॅपिड चाचणीचा अहवालही पॉझिटिव आला होता.  तर सकाळी प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालात वाडेगव्हाण येथील २३ वर्षीय 
तालुक्यात आज दिवसभरात एकूण १५ जणांना कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोरोना बाधित व्यक्ती आढळला आहे तो १०० मीटर परिसर १४ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.