Breaking News

पारनेर शहरातील 7 व्यक्ती कोरोना बाधित, पारनेर तालुक्यात दिवसभरात 22 कोरोना बाधित !

पारनेर शहरातील 7 व्यक्ती कोरोना बाधित पारनेर तालुक्यात दिवसभरात 22 कोरोना बाधित !
पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील  22 कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे त्यांच्या चाचणी अहवालानुसार निष्पन्न झाले आहे. अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
यामध्ये पारनेर येथील  बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 7  व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव आले आहेत तर सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपनीत 1 वाडेगव्हाण 1 किन्ही 1 म्हसणे 1 सांगवी सुर्या 1 हे अहवाल संध्याकाळी प्राप्त झाले आहेत असे एकूण 12 अहवाल संध्याकाळी प्राप्त झाले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ  प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
दुपारपर्यंत पारनेर जेलमधील कैदी 1 म्हसणे 1  जामगाव 1  टाकळी ढोकेश्वर 5 निघोज 1 सुपे 1 व्यक्तींचा समावेश आहे. असे एकूण दहा जणांचा समावेश होता.
पारनेर तालुक्यातील एकूण आज दिवसभरातील कोरोना बधितांची संख्या 22 वर गेली आहे.
     ज्या परिसरात कोरोना बाधित व्यक्ती आढळला  आहे तो 100 मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी  आदेश दिले आहेत.