Breaking News

पारनेर तालुक्यातील आज सकाळी प्राप्त झालेले ७ अहवाल पॉझिटिव्ह, २७ अहवाल निगेटिव्ह !
-------------
जवळा कान्हूर पठार कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे !


पारनेर प्रतिनिधी - 
      पारनेर तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालात 7 अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत तर 26 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये तालुक्यातील सुपा 3 सिद्धेश्वर वाडी 2 जवळा 1 कान्हूर पठार 1 या गावाचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
तर तालुक्यातील 26 अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाले आहे त्यामध्ये पारनेर 12 सुपा 4 कान्हूर पठार 4 कळस 2 भांडगाव 1 किंन्ही 1 जवळा 1 गुणोरे 1 या गावांचा निगिटिव्ह अहवालात समावेश आहे.
तालुक्यातील जवळा व कान्हूर पठार येथे कोरोना बधितांची संख्या वाढली आहे तर आज प्राप्त झालेल्या अहवालात पारनेर शहरातील 12 अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे पारनेरकरना दिलासा मिळाला आहे.