Breaking News

आमदार डॉ किरण लहामटे यांचे हस्ते आढळा धरणाचे जलपूजन !

आमदार डॉ किरण लहामटे यांचे हस्ते आढळा धरणाचे जलपूजन ! अकोले/ प्रतिनिधी :
     अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्याला वरदान  ठरलेले अकोले तालुक्यातील आढळा धरनाचे आज आमदार डॉ किरण लहामटे यांचे हस्ते   वाजत गाजत जलपुजन करण्यात आले
आज सोमवारी  सकाळी  9 वाजता वाजंत्री च्या ताफयासह   वाजत गाजत  धरणस्थळी जाऊन आमदार डॉ  किरण लहामटे यांनी  आढळा  धरणाचे जलपुन केले यावेळी त्यांच्या समवेत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे,  जेष्ठ नेते दादा पाटील वाकचौरे, देवठाण गावच्या सरपंच  रोहिणी सोनवणे   तसेच  पाटबंधारे   विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता   गणेश हारदे , उपविभागीय अभियंता   आर. एम. देशमुख ,शाखा अभियंता  अभिषेक पवार ,आर बी कवडे, आर एच बोरसे महेश सूर्यवंशी आदी  सह ग्रामस्थ उपस्थित होते.


      तालुक्यातील देवठाण येथील १०६० द.ल.घ.फु क्षमता असलेले आढळा धरण काल रविवारी दुपारी एक वाजता  भरून सांडव्यावरून वाहू लागले अकोले,संगमनेर व सिन्नर या तीन तालुक्यातील , देवठाण , विरगाव, हिवरगाव आंबरे , गणोरे ,डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी, वडगाव लांडगा, जवळे कडलग, धांदरफळ,राजापूर, चिकणी, निमगाव भोजापूर, नळवाडी, कासारवाडी, अशा पंधरा गावातील शेतीसाठी याधरणाच्या पाण्याचा उपयोग होतो. 
आज  सोमवारी सकाळी आढळा धरणाचे जलपूजन झाल्यानंतर त्यावरील सांगवी व पडोशी धरणांचे शासकीय जलपूजन आमदार किरण लहामटे यांचे हस्ते करण्यात आले.
 
----