Breaking News

दुधातील भेसळ रोखल्याशिवाय दुध उत्पादकांना कायमचे अच्छे दिन येणार नाहीत - अनिल देठे पाटील !दुधातील भेसळ रोखल्याशिवाय दुध उत्पादकांना कायमचे अच्छे दिन येणार नाहीत - अनिल देठे पाटील !

शेतकरी नेते अनिल देठे पाटील त्यांची आक्रमक भूमिका

शासनाने दूध उत्पादकांना थेट दर वाढ द्यावी प्रमुख मागणी

शेतकऱ्यांनी दुधाचा घातला दगडावर दुग्ध अभिषेक
पारनेर प्रतिनिधी : 
              राज्यात दुधात होणारी भेसळ रोखल्याशिवाय राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना कायमचे अच्छे दिन येणार नाहीत.शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांचे प्रतिपादन !
           दुध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्यात १ ऑगस्ट रोजी दुध बंद एल्गार आंदोलन पुकारले होते , त्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यात देखील बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनात सहभागी होत दुध संकलन केंद्रांना दुध न देता त्या दुधाचे समाजातील गरजुनां मोफत वाटप केले व आपापल्या गावातील ग्रामदैवतांना दुग्धाभिषेक घालत राज्य सरकारचा निषेध केला.याच दरम्यान किन्ही येथे शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली किन्ही , बहिरोबावाडी येथील शेतकऱ्यांनी  गावातील दुधसंस्थांना एक लिटर हि दुध न देता एकञ येत ग्रामपंचायत कार्यालयासमोर दगडावर दुग्धाभिषेक घातला तसेच समाजातील गरजुनां मोफत दुध वाटप देखील केले.
                या वेळी बोलताना देठे पाटील म्हणाले की , राज्यात प्रतिदिन १ कोटी ३० लक्ष लिटर दुधाचे उत्पादन होते यापैकी ९० लाख लिटर दुधाची बंदपिशवीतून विक्री होत होती तर २५ लक्ष लिटर दुधापासून दुध भुकटी तयार केली जात होती व १५ लक्ष लीटर दुधापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती होत असे परंतु कोरोनाच्या महासंकटामुळे राज्यातील हॉटेल्स , स्विट होम बंद आहेत. तसेच राज्यात ५५ हजार मेट्रिक टन दुधभुकटी देखील तशीच पडून आहे.यामुळे दुधाच्या मागणीत मोठी घट झाली असल्याने साधारण ५० लाख लिटर अतिरिक्त दुध निर्माण झाले आहे. व यामुळे दुध खरेदी दरावर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे.खरेदीदरात प्रतीलीटर ३२ रूपयांवरून थेट प्रतिलीटर १७ ते १८ रूपयांपर्यंत घसरण झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. संकटात सापडलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना जर कायमस्वरूपी दुध व्यवसायात अच्छे दिन आणायचे असतील तर राज्य सरकारने सर्वात प्रथम दुध शितकरण , निर्जंतुकीकरण व प्रोसेसिंगच्या नावाखाली दुधात होणारी भेसळ तसेच टोण्ड दुध व डबल टोण्ड दुधावर कायमचीच बंदी घालणे आवश्यक आहे. त्याशिवाय दुधाचे दर नैसर्गिकरीत्या वाढणार नाहीत.राज्य सरकारने असा धाडसी निर्णय घेतल्यास दुध दराबाबतच्या समस्यांचे समुळ उच्चाटन होऊन ग्राहकांना देखील शुध्द व गुणवत्तापूर्ण दुध मिळेल व शेतकऱ्यांच्या दुध व्यवसायात देखील बरकत येईल.परंतु राज्य सरकार इतक्या सहजासहजी असा काही निर्णय घेईल असे वाटत नाही , यासाठी कोरोनाचा प्रार्दुर्भाव संपल्यानंतर व्यापक स्वरूपाचा लढा नजिकच्या काळात उभारावा लागेल.सध्यस्थितीत दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने दुधाला प्रतिलीटर १० रूपये अनुदान द्यावे किंवा प्रतिलिटर ३० रूपये दर द्यावा तसेच दुधभुकटिला निर्यातीवर प्रतिकीलो ५० रूपये अनुदान द्यावे अशा मागण्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आपण राज्य सरकारसमोर ठेवल्या असुन , राज्य सरकारने आपल्या मागण्या मान्य न केल्यास राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा ऑनलाईन बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            या वेळी माजी सरपंच बाबासाहेब व्यवहारे , प्रा.साजन खोडदे , प्रा.सचिन मोढवे , माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खोडदे , आदिनाथ व्यवहारे , संपत खोडदे , सखाराम खोडदे , सुनिल खोडदे , बाळासाहेब खोडदे , संतोष खोडदे , बाळासाहेब देशमुख , माणिक खोडदे , भास्कर देठे , पांडुरंग व्यवहारे ,  यशवंत व्यवहारे , शरद व्यवहारे , भिकाजी व्यवहारे , किरण व्यवहारे , मोहन मोढवे , सुभाष मोढवे , अभिमन्यु खोडदे , प्रविण पवार , संग्राम खोडदे , देवराम खोडदे , संतोष निमसे , संतोष व्यवहारे , मनोज साकुरे , आबासाहेब साकुरे , नागेश खोडदे , प्रभाकर मुळे , मधुकर खोडदे , सुभाष मुळे , अशोक खोडदे , शिवाजी खोडदे ,  आदी दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

 शेतकरी नेते अनिल देठे पाटील व शेतकऱ्यांनी दगडावर दुग्ध अभिषेक घातला त्या आंदोलनाची धार यापुढे अजून तीव्र केली जाईल असा इशारा यावेळी देठे पाटील यांनी दिला मात्र दुधातील भेसळ रोखली जात  नाही तोपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाही असेही देठे पाटील यांनी सांगितले त्यामुळे येत्या काळामध्ये आंदोलन भेसळ करणाऱ्या माफियांविरोधात सरकारचे कान उघडण्यासाठी करावे लागणार तर नाही ना असा सवाल उपस्थित होतो!