Breaking News

स्व.मा.आ.वसंतराव झावरे पाटील हे पारनेर तालुक्याचे कर्मयोगीच - दिलीपराव ठुबे.

स्व.मा.आ.वसंतराव झावरे पाटील हे पारनेर तालुक्याचे कर्मयोगीच - दिलीपराव ठुबे
पारनेर/प्रतिनिधी : 
श्री.भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयातील एस एस सी परीक्षा मार्च 2020 मध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देवकृपा प्रतिष्ठाणच्या वतीने सुजित झावरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व दिलीपराव ठुबे साहेब,खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंगजी गायकवाड साहेब संस्थेचे सचिव सुदेश झावरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तसेच विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी बा.ठ.झावरे यांनी वासुंदे येथे अकरावी चे वर्ग सुरू करण्याची मागणी केली.
    स्व.वसंतराव झावरे पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये तालुक्यातील आदिवासी भागातील विदयार्थ्यांची सोय होण्याच्या दृष्टीने शिक्षणाची दालने उभे केली.राज्य शिक्षण समितीचे अध्यक्ष असताना स्व. दादांनी आपल्या कोठ्यातील विदयालय स्वतः पुरती मर्यादित न ठेवता तालुक्यातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिली व तालुक्यात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी संधी निर्माण केली एका प्रकारे ते पारनेर तालुक्यातील कर्मयोगीच होते असे प्रतिपादन दिलीपराव ठुबे यांनी केले.
खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष *पांडुरंग गायकवाड* यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्व.दादांनी या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
स्व.दादांनी शिक्षणाचा पाया रचला व आज सुजित पाटील यांनी वासुंदे तसेच वनकुटे येथे सर्व सोयीयुक्त इमारतीची उभारणी करून आपल्या शिक्षण संस्थेचे नावलौकिक केले आहे. यावेळी सुजित पाटील यांना पिंपळगाव रोठा येथील आपल्या विद्यालयामध्ये ११ वी वर्ग सुरू करणेबाबत मागणी केली.जेणे करून आमच्या पठार भागातील विद्यार्थ्यांची सोय होईल.
      सुजित झावरे पाटील म्हणाले की, आज शाळेचा आलेख चढता क्रमांकावर असून तालुक्यातील ही अग्रगण्य संस्था आहे. आज वासुंदे येथील इमारती चे काम पूर्णत्वास आले असून वनकुटे,पोखरी,पळसपूर येथील इमारतीच्या कामांना गती मिळत आहे. विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून जाऊ नये व अपयशाने खचून जाऊ नये.समाजात जबाबदारी व्यक्ती झाल्यावर मात्र आई-वडील,गुरुजन व समाज यांचा विसर पडू देऊ नका.
यावेळी कार्यक्रमासाठी खंडोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जालिंदर खोसे,किसन धुमाळ,पत्रकार सनी सोनावळे, व्यवहारे सर,मा.सरपंच शिवाजीकाका पाटील,दिलीपराव पाटोळे,बा.ठ.झावरे,पोपटराव झावरे,बाळासाहेब झावरे पाटील,शरदराव पाटील,बाळासाहेब झावरे,भाऊसाहेब सैद,दिलीपराव उदावंत,रा.बा. झावरे सर,किसननाना वाबळे,रभाजी झावरे सर,पोपट हिंगडे,मच्छिंद्र वाबळे, पंढरीनाथ गांगड,पोपटराव ठुबे,अशोक चेमटे सर , मारुती उगले गुरुजी,पीडी बर्वे सर,वैभव बर्वे,विकास झावरे, विठ्ठल झावरे,संग्राम झावरे,धनंजय उदावंत,सचिन साठे, प्रसाद झावरे तसेच संस्थेचे मुख्याध्यापक,शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.