Breaking News

शिवसेनेत प्रवेश केलेले मंत्री शंकरराव गडाख घडवणार अहमदनगर मध्ये राजकीय भूकंप !

 Shankarrao Gadakh Patil joins Shiv Sena | Deccan Herald

अहमदनगर  :  महाविकास आघाडी सरकारमधील जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीत आहे. याची सुरुवात ते श्रीगोंदा तालुक्यातून करणार आहे. पुढील आठवड्यात माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते व अन्य दहा-बारा कार्यकर्ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी राजेंद्र म्हस्के व वैभव पाचपुते यांनी सोनईत शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्याशी चर्चा केली. त्यासाठी भानगावचे शरद कुंदाडे यांनी मध्यस्थी केली आहे. प्रशांत गडाख यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या कानावर हा विषय घातला असून, पुढील आठवड्यात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे समजते.

अहमदनगर जिल्ह्याची शिवसेनेची सर्व सूत्र शंकरराव गडाख यांच्याकडे आल्यापासून त्यांनी जिल्ह्यात गडाख पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दिवसांपासून राजेंद्र म्हस्के व वैभव पाचपुते नाराज असल्याचे दिसत होते. अखेर आता ते शिवबंधन बांधणार आहे.