Breaking News

कोपरगाव तालुक्यात दुपारपर्यंत १८ कोरोना बाधित !

कोपरगाव तालुक्यात दुपारपर्यंत १८ कोरोना बाधित !
करंजी प्रतिनिधी- 
   आज दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजे पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोपरगाव केअर सेंटर मध्ये एकूण ७३ संशयितांची रॅपिड किट द्वारे तपासणी केली असता त्यात १८ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले व  ५५ अहवाल निगेटीव्ह आले असून आज ११ संशयितांचे स्राव पुढील तपासणीसाठी नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल ला पाठविण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
      यात अनुक्रमे चांदेकसारे-१, येसगाव-१, पोहेगाव-८, सोनारी-३, ब्राह्मणगाव-२, टाकळी-१, कोपरगाव शहरातील जानकी विश्व व सुभद्रा नगर भागात प्रत्येकी १ असे एकूण १८ रुग्ण आज कोपरगाव तालुक्यात सापडले असले तरी गेल्या २ दिवसाच्या तुलनेत आजची संख्या कमी असल्याने कोपरगाव तालुक्या साठी दिलासादायक बाब असली तरी काळजी घेणे गरजेचे आहे.
     आज दुपारपर्यंत कोरोना वर पूर्ण पणे उपचार घेऊन बरे झालेल्या ३० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.आज तालुक्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १८८ झाली असून तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ३२८ वर गेली आहे.